महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या, घुग्गूसमधील राजीवरतन रुग्णालयातील घटना - चंद्रपूर न्युज

चंद्रपुरातील घुग्गूस येथील रुग्णालयात एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Mar 25, 2020, 11:44 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील घुग्गूस येथील एका रुग्णालयात सोमवारी दाखल झालेल्या रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) घडली. सुरेश हिरादेवे, असे मृताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सुरेश वेकोली कर्मचारी होता. तसेच त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच त्याला सोमवारी घुग्गूस येथील वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात दाखल केले होते. त्याने मंगळवारी रुग्णालयाच्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details