चंद्रपूर -जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्याला तेलंगणाची सीमा लागून आहे. तालूक्यातील हिरापूर सीमेवरुन नागरिकांचे सीमोल्लंघन सुरू असल्याचे लक्षात येताच पाटण पोलीसांनी थेट जेसीबीने रस्ताच खोदून काढला.
...अन् पाटण पोलिसांनी जेसीबीने खड्डा खोदून राज्याची सीमा केली बंद
पाटण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर सीमेवरुन नागरिक तेलंगणा-महाराष्ट्रात ये जा करत असल्याची माहिती पाटण पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक प्रकाश चौधरी यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी थेट हिरापूर गाठून गावकर्यांच्या मदतीने बंडाकसा-हिरापूर मार्ग जेसीबीने खड्डा खोदून रस्ता बंद केला.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पाटण पोलीसांची दोन्ही राज्याचा सीमेवर नाकाबंदी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. तर, राज्याचा सिमेवर खडा पहारा सुरू आहे. अशातच जिल्ह्यात येणाऱ्या जिवती तालूक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने लॉकडाऊनमध्येही नागरिकांचे सीमोल्लंघन सुरुच आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, पाटण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर सीमेवरुन नागरिक तेलंगणा-महाराष्ट्रात ये जा करत असल्याची माहिती पाटण पोलीस ठाण्याचे उप-निरीक्षक प्रकाश चौधरी यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी थेट हिरापूर गाठून गावकर्यांच्या मदतीने बंडाकसा-हिरापूर मार्ग जेसीबीने खड्डा खोदून रस्ता बंद केला. यावेळी बिट अमलदार साहेबराव कालापाहड, राहुल मसाडे, रवी शेडमाके, परमेश्वर गडदे, सतिश पाचभाई, सुरज जांभुळे, तिरुपती पोले, विठ्ठल घाडगीळ, तुळशीदास बिडगिड आदि उपस्थित होते. सोबतच, तेलंगणा सीमेवरही पाटण पोलीसांनी नाकाबंदी केली असून पोलीस चोख पहारा देत आहेत.