चंद्रपूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतूने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन २०२०-२१ या पणन हंगामासाठी जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मान्यता दिली आहे.
यात बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत २७ केंद्र व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. यांच्या मार्फत २७ धान केंद्र, अशी एकूण ५४ धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली आहे.
बिगर आदिवासी क्षेत्रासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे पुढील प्रमाणे तालुकानिहाय धान खरेदी केंद्रे आहेत. मुल तालुक्यातील मुल व राजोली, सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द), व्याहाड (बु) व पाथरी, सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, रत्नापूर व सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील कोर्धा, नागभीड व तळोधी (बा), ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही, चौगान, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, आवळगाव व अऱ्हेर नवरगाव, चिमूर तालुक्यातील चिमूर व नेरी, गोंडपिंपरी तालुक्यातील गोंडपिंपरी, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा दीक्षित येथे धान खरेदी केंद्र आहेत.
आदिवासी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. पुढील प्रमाणे तालुकानिहाय धान खरेदी केंद्रे आहेत. नागभीड तालुक्यातील नवखळा, सावरगाव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगाव, जिवनापूर, गोविंदपूर, वाढोणा येथे धान खरेदी केंद्र असणार आहे. सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडीमेंढा, लाडबोरी, मुरमाडी, कळमगाव (गन्ना), शिवणी, नाचणभट्टी येथे धान खरेदी केंद्र असणार आहे. चिमूर तालुक्यातील डोमा, खांबाडा, बोडधा, आंबेनेरी, अडेगाव (देश), मासळ, टेकेपार, मोटेगाव येथे धान खरेदी केंद्र असणार आहेत. तसेच, वरोरा तालुक्यातील चारगाव (बु), वडधा (बु), भटाळा तर भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे देखील धान खरेदी केंद्र आहेत.
...असा आहे धान खरेदीचा कालावधी
खरीप पणन हंगामासाठी दिनांक १ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत, तर खरीप पणन हंगामसाठी (रब्बी/उन्हाळी) दिनांक १ मे २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंत आहे. आधारभूत योजनेंतर्गत धान खरेदीचे दर हे ‘अ’ दर्जाच्या धानाकरिता प्रति क्विंटल रू. १ हजार ८८८ व साधारण धानाकरिता प्रति क्विंटल रू. १ हजार ८६८ असे शासनाने ठरवून दिलेले असून या किमतीमध्ये बोनसचा समावेश नाही.