महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमूर विधानसभेत तिरंगी लढत; कोण मारणार बाजी? - भाजप उमेदवार किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया

चिमूर विधानसभा हा राज्य निर्मितीपासून काँग्रेसचा गड राहिला आहे. या गडाला सर्वप्रथम अपक्ष उमेदवार डॉ. रमेशकुमार गजभे यांनी 1995 मध्ये तडा दिला होता. त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे विजय वडेट्टीवार यांनी 2004 मध्ये या ठिकाणी भगवा फडकवला होता.

चिमूर विधानसभेत तिरंगी लढत

By

Published : Oct 18, 2019, 1:00 PM IST

चंद्रपूर- चिमूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला आहे. या मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत काँग्रेसचे डॉ .सतिश वारजुरकर आणि भाजपचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया तसेच भाजपमधून बंडखोरी केलेले धनराज मुंगले यांच्यात होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -चंद्रपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ जणांवर तडीपारीची कारवाई

चिमूर विधानसभा हा राज्य निर्मितीपासून काँग्रेसचा गड राहिला आहे. या गडाला सर्वप्रथम अपक्ष उमेदवार डॉ. रमेशकुमार गजभे यांनी 1995 मध्ये तडा दिला होता. त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे विजय वडेट्टीवार यांनी 2004 मध्ये या ठिकाणी भगवा फडकवला होता. मात्र, त्यांनतर वडेट्टीवार यांनी काँग्रेसाचा 'हात' पकडल्यानंतर ही विधानसभा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेली. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी विजय प्राप्त केला. तर यंदा भांगडिया यांना पुन्हा भाजपने तिकीट दिले आहे. त्यामुळे धनराज मुंगले यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.

हेही वाचा - चंद्रपुरात परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान

मतदारसंघात धनराज मुंगले यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर मुंगले यांना भाजपच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे धनराज मुंगले यांच्या निवडून येण्याच्या आशा वाढ्ल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details