महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ammunition Export From India: चांदा आयुध निर्माणीमुळे देशाला मिळणार ८० कोटींचे परकीय चलन, 'हे' उत्पादन केले निर्यात

भारत देशाला एकेकाळी प्रगत देशांच्या दारूगोळ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. युरोपियन देश आणि अमेरिकेच्या अत्याधुनिक आयुधांशिवाय युद्धाची कल्पना करणे देखील कठीण होते. मात्र, आता या स्थितीचा कायापालट झाला आहे. भारत आता आत्मनिर्भर तर झालाच, मात्र त्यासोबत तो इतर देशांना देखील निर्यात करत आहे. चंद्रपुरातील चांदा आयुध निर्माणी येथे बेल्जियमला आवश्यक असलेला दारुगोळा नुकताच तयार झाला आहे. त्याची पहिली खेप देखील रवाना झाली आहे. ज्याची औपचारिकता नुकतीच पार पडली. या आयुध निर्माणीत पहिल्यांदाच हे घडले आहे.

Ammunition Export To Belgium
बेल्जियमला दारूगोळा निर्यात

By

Published : Jul 18, 2023, 7:23 AM IST

Updated : Jul 18, 2023, 7:35 AM IST

बेल्जियमला दारूगोळा निर्यात

चंद्रपूर :भारत केवळ संरक्षण साधनांची केवळ आयात नव्हे तर निर्यातदेखील करत आहेत.चांदा आयुध निर्माणीतून विदेशात दारूगोळा निर्यातीची पहिली खेप गेली आहे. आता इतर देशांसाठी देखील दारूगोळा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामधून देशाला 80 कोटींचे परकीय चलन मिळणार आहे. ऑक्टोबर 2021 ला देशातील सर्व आयुध निर्माणीचे निगमीकरण करण्यात आले. त्याचे सात स्वायत्त कंपन्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती स्थित चांदा आयुध निर्माणीला म्युनेशन इंडीया लिमिटेड या समूहात सामील करण्यात आले. या आयुध निर्माणीत युद्धासाठी दारुगोळा तयार केला जातो.

दारुगोळा तयार करण्याचे कंत्राट :कारगिल युद्धात येथे तयार झालेल्या तोफगोळ्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र आत्तापर्यंत येथे भारतीय सैन्यासाठीच दारुगोळा तयार करण्यात येत होता. मात्र निगमीकरण होताच बेल्जियम सारख्या देशातून दारुगोळा तयार करण्याचे मोठे कंत्राट मिळाले. त्यानुसार पहिल्यांदाच याचे यशस्वी उत्पादन करण्यात आले. त्याची पहिली खेप या देशाकडे रवाना झाली आहे. यावेळी अप्पर महाव्यवस्थापक राकेश ओझा, वरीष्ठ गुणवत्ता आश्वासक अधिकारी एस. एस. मुंगसे, संयुक्त महाव्यवस्थापक एम. एन. सुपे, आर. के. चौधरी, नवीन गेहलोत तसेच इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


काय आहे 155 एमएम कॅलिबर :तोफ चालविण्यासाठी तोफगोळ्यांची अवश्यकता असते. त्यात 155 एमएमचा तोफगोळा सर्वात आधुनिक आहे. तो 24 किलोमीटरपर्यंत अचूक मारा करू शकतो. उणे 20 ते अधीक 60 डिग्रीपर्यंत हा गोळा निकामी होत नाही. तब्बल 15 वर्षांपर्यंत याचे जीवन आहे. त्यामुळे जगात याची मोठी मागणी आहे, ज्याचे उत्पादन चांदा आयुध निर्माणीत घेतले जात आहे.


आयुध निर्माणीचा इतिहास :आयुध निर्माणीचा इतिहास हा जवळपास 222 वर्षांपूर्वीचा आहे. इंग्रज काळापासून या आयुध निर्माणीची स्थापना झाली. म्हणून हा दिवस आयुध निर्माणी दिवस म्हणून साजरा केला जातो. 18 मार्च 1802 मध्ये काशीपूर कोलकत्ता येथे देशाच्या पहिल्या आयुध निर्माणीची स्थापना झाली. यानंतर देशात जवळपास 41 आयुध निर्माणी सध्या कार्यरत आहेत. त्यांचे आता खासगीकरण झाले आहे. या निर्माणीमध्ये तिन्ही सुरक्षा दलाला आवश्यक असलेले दारूगोळा, तोफ, बंदूका, उपकरणे आणि तंत्रज्ञान यंत्रणा विकसित केली जाते.

चांदा आयुध निर्माणीची स्थापना :चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे चांदा आयुध निर्माणीची घोषणा 1962 मध्ये करण्यात आली. तब्बल दोन हजार एकरमध्ये पसरलेल्या या विस्तीर्ण उद्योगांमध्ये 1970 पासून दारूगोळा व विविध शस्त्र तयार करण्याचा कारखाना आणि उत्पादन सुरू झाले. चांदा आयुध निर्माणीमध्ये तोफगोळे, ग्रेनेद, बंदुकाला लागणारा दारू दारूगोळा तसेच इतर सुरक्षा संबंधित उपकरणे तयार केली जातात. 1970 मध्ये 13 युनिटमध्ये आठ हजार कर्मचारी कार्यरत होते. त्याकाळी तंत्रज्ञान तेवढे विकसित न झाल्याने मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागत होते. सध्या चांदा आयुध निर्माणीत 14 युनिट स्थापन आहे. अडीच हजार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर येथे काम चालते.

हेही वाचा :

  1. जम्मू काश्मीरमध्ये ३ हँड ग्रेनेड आणि 54 काडतुसे जप्त, सुरक्षा दलाची कारवाई
  2. तांबवे पुलाखाली सापडलेले हॅण्ड ग्रेनेड 1961 सालातील बनावटीचे
  3. Arms Recovered In Jammu : जम्मूमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त, तिघांना अटक
Last Updated : Jul 18, 2023, 7:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details