चंद्रपूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश्यात टाळेबंदी लागु झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन कठोर पावले उचलत आहे. टाळेबंदीत केवळ किराणा, भाजीपाला, मेडिकल सूरु आहेत. मागिल सात दिवसापासून राजूरा येथिल चिकन, मटण मार्केटला टाळे लागले होते. नगरपरिषदेनेच मटण, चिकन सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून भाजीपाला खाणाऱ्याना आता मटणाची चव चाखायला मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याच्या लोकांना चाखायला मिळणार मटणाची चव - कोरोना विषाणू बद्दल बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात दाळेबंदी लागू झाली असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू सोडता राज्यातील बाजारपेठा बंद आहेत. मात्र, राजुरा नगरपरिषदेने मटण, चिकन सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
![चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याच्या लोकांना चाखायला मिळणार मटणाची चव order-to-start-meat-chicken-shops-in-rajura-municipal-council-area-of-chandrapur-district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6551462-382-6551462-1585227240860.jpg)
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरच्या लोकांना मटणाची चव चाखायला मिळणार
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याच्या लोकांना मटणाची चव चाखायला मिळणार
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहराच्या मध्यभागी दैनदिन भाजीपाला बाजार भरत होता. भाजीपाला घेण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करत होते. शहराचा मध्यभागी होणारी गर्दी टाळण्यासाठी दैनंदिन भाजीपाला बाजार सोमणाथपूर येथे हलविण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे. सोमनाथपूर येथे राजूराचा आठवडी बाजार भरत असतो. यासोबतच मागिल सात दिवसापासून बंद असलेली मटण,चिकन सेंटर सूरु करण्याचे आदेश राजूरा नगर परिषदेने दिले आहेत.