चंद्रपूर - जिल्ह्यात राजुरा येथील एका २७ वर्षीय तरुणाचा वैद्यकीय तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा २३ वर पोहोचला आहे.
मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी येथून हा युवक २५ मे रोजी विमानाने नागपूरला आला होता. नागपूर, चंद्रपूर, राजुरा प्रवास केल्यानंतर त्याला २५ रोजी राजुरा येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्याला ३० तारखेला लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर ३० मे ला त्याचा स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. रविवारी ३१ मे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.