महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर : आणखी एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 22 वर - कोरोना केसेस चंद्रपूर बातमी

२३ मे रोजी चिरोली या गावातील २६ वर्षीय महिलेच्या घशातील स्वॅब चाचणीकरता पाठवण्यात आले होते. याचा अहवाल सोमवारी संध्याकाळी प्राप्त झाला असून ती महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तर, यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २२ वर जाऊन पोहोचला आहे.

चंद्रपुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह
चंद्रपुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 26, 2020, 2:08 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण २२ होती. सोमवारी सायंकाळी त्यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. मूल तालुक्यातील चिरोली येथील २६ वर्षीय महिलेचा २३ मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता. याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून ही महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धाकधूक आता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात मुंबई रिटर्न्समुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत असल्याने नागरिकांसह प्रशासनही चिंताग्रस्त आहे. जिल्ह्यात 2 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर 13 मे ला बिनबा वॉर्ड येथील एक युवती कोरोनाग्रस्त आढळली होती. मात्र, यानंतर 20 मे ला तब्बल दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर 23 मे रोजी 7 जण, 24 मे ला 2 जण तर, 25 मे ला मूल तालुक्यातील चिरोली या गावातील 26 वर्षीय महिला पॉझिटिव्ह निघाली.

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 22 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ते पुणे, मुंबई, मालेगाव येथून परत आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाविषयीची धाकधूक आता वाढू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details