महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावीतून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण: एकूण रुग्णांची संख्या 14 वर - chandrapur covid 19 patient

धारावीमधून आलेल्या नागरिकाला सुरुवातीपासून संस्थात्मक अलगीकरण ठेवण्यात आले होते. 22 मे रोजी सकाळी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णासोबतच जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 14 झाली आहे.

covid 19
धारावीतून आलेला युवक कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 23, 2020, 9:31 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार आज दुपारी बल्लारपूर येथील 37 वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूर शहरात पोहोचला होता.

धारावीमधून आलेल्या नागरिकाला सुरुवातीपासून संस्थात्मक अलगीकरण ठेवण्यात आले होते. 22 मे रोजी सकाळी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णासोबतच जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या 14 झाली आहे. तत्पूर्वी आज सकाळी चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील एका युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती.

यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात होती. 16 मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली. तेव्हापासून होम क्वारंटाईन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या युवतीच्या घरातील आई, वडील आणि बहीण या तिघांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details