चंद्रपूर -महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक कोरोणाचे बाधीत रूग्ण आढळे असून सर्वाधिक मृत्यूही राज्यातच झाले आहेत. या विपदेच्या काळात वन विकास महामंडळ खडसंगी परीक्षेत्रात वनपाल तथा विशेष पथकाचे प्रमुख रमेश बलैया यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एप्रील महिन्याचे वेतन आर्थिक मदत म्हणून दिले आहे.
वनपालानी दिेले मुख्यमंत्री साहय्यता निधीत एक महिन्याचे वेतन - news about corona
खडसंगी परिक्षेत्राचे तथा वन संरक्षणा करीत असलेल्या विशेष पथकाचे प्रमूख रमेश बलैया यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. या बाबत पत्र विभागीय व्यवस्थापक पच्छिम चांदा, वन प्रकल्प विभाग चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.
भारतात व महाराष्ट्रातसुद्धा कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्याकरता लॉकडाऊन घोषीत केला आहे. या परिस्थितीमध्ये वन विकास महामंडळाच खडसंगी परिक्षेत्राचे वनपाल तथा वन संरक्षणा करीता असलेल्या विशेष पथकाचे प्रमूख रमेश बलैया समाज माध्यमावर कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये तथा सामाजिक अंतर ठेवण्या करीता जागृती करीत आहेत. हे करत असताना कोरोणा विरोधातील सर्व प्रकारच्या योद्ध्यांना येणाऱ्या अडचणी तथा गरीब मजुरांचे हाल पाहून त्यांनी आपले आर्थिक योगदान मुख्यमंत्री सहायता निधीत द्यायचे ठरविले.
महाराष्ट्र राज्याने या आपदेच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत देण्याकरिता जनतेला आवाहन केले. त्याप्रमाणे आपले राष्ट्रिय कर्तव्य म्हणून एप्रील महिन्याचे संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत द्यावे असे पत्र बलैया यांनी विभागीय व्यवस्थापक पच्छीम चांदा, वन प्रकल्प विभाग चंद्रपूर यांना दिले आहे. त्यांच्या या आर्थीक योगदाना बद्दल सर्व स्तरातून अंभीनंदन होत आहे .