नदीत बुडून एकाचा मृत्यू; कोरपना तालुक्यातील घटना - कोरपना तालुक्यातील घटना
कोरपना तालुक्यातील भोईगुडा येथील पैनगंगा नदीच्या घाटावर मासोळी पकडण्यासाठी प्रमोद तांदूळकर गेले होते. नावेवर बसून नदीतील मासोळी पकडत होते.

चंद्रपूर -मासोळी पकडण्यासाठी नदीवर गेलेल्या एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे घडली. प्रमोद तांदूळकर (वय 35) असे या मृताचे नाव आहे.
कोरपना तालुक्यातील भोईगुडा येथील पैनगंगा नदीच्या घाटावर मासोळी पकडण्यासाठी प्रमोद तांदूळकर गेले होते. नावेवर बसून नदीतील मासोळी पकडत होते. त्यांच्यासोबत चार सहकारी होते. नदीत नाव असताना वादळी पावसाला सुरुवात झाली, वादळ जोराचे असल्यामुळे नाव पलटली. तांदूळकर यांचे सहकारी कसेबसे नदीतून बाहेर निघाले मात्र तांदूळकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा शोध घेण्यात आला, मात्र अंधारामुळे व्यत्यय येत होता. आज (गुरुवार) सकाळी मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास कोरपनाचे ठाणेदार गुरनुले करीत आहेत.