चंद्रपूर- दोन ट्रकच्या मध्ये चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गडचांदूर येथे घडली आहे. प्रफुल्ल खामनकर, असे मृतकाचे नाव आहे.
दोन ट्रकच्या मध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू - दोन ट्रक
दोन ट्रकच्या मध्ये चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
![दोन ट्रकच्या मध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू मृत प्रफुल्ल खामनकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5882163-326-5882163-1580285635270.jpg)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक खडी (क्र. एम एच 34 बि जी 7767) भरुन गडचांदूरहून राजुराकडे जात होता. ट्रकचा पाठीमागे प्रफुल्ल खामनकर हा आपल्या मोटारसायकलवरून ( क्र. एम एच 34 - 8838) कामावर चालला होता. तर खामनकर यांचा दूचाकी मागे आणखी एक ट्रक खडी भरून (एम एच 34 बी जी 7786) जात होता.
दुचाकीच्या पुढील ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे त्यामागे दुचाकीस्वार खामनकरने ही ब्रेक मारला. पण, दुचाकीच्या मागे असणाऱ्या ट्रकला लागलीच ब्रेक लागला नाही. त्यामुळे दुचाकीच्या मागच्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढील ट्रकला धडकली. त्यामुळे दुचाकीस्वार चिरडला गेला. यात प्रफुल्ल खामनकर याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास गडचांदूर पोलीस करत आहेत.