महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बल्लारपूर मार्गावर दुचाकीचा अपघात.. एकाचा मृत्यू, एक गंभीर - ट्रक- दुचाकी अपघात चंद्रपूर

बल्लारपूर-विसापूर मार्गावर पॉवर हाऊस जवळ ट्रक उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. यात सुमित विनोद पुरी याचा जागीच मृत्यू झाला.

one-dead-and-one-injured-in-bike-accident-at-chandrapur
बल्लारपूर मार्गावर दुचाकीचा अपघात..

By

Published : Jun 27, 2020, 1:16 PM IST

चंद्रपूर- उभ्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर शनिवारी सकाळी घडली. यात दोघेही अल्पवयीन आहेत.

बल्लारपूर-विसापूर मार्गावर पॉवर हाऊस जवळ ट्रक (एपी 01 डब्ल्यू 4422) उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने (एम एच 34 बीपी 2927) जोरदार धडक दिली. यात सुमित विनोद पुरी याचा जागीच मृत्यू झाला. तर गुड्डू मेश्राम हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही अल्पवयीन असून बल्लारपूर शहरातील कन्नमवार वॉर्ड येथील रहिवासी आहेत. जखमीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यामुळे अल्पवयीन मुलांचा गाडी चालविण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चंद्रपूर मार्गावर दोन्ही बाजूला नेहमीच ट्रकच्या रांगा असतात. अशावेळी वाहन चालविणे अवघड होऊन जाते. या घटनेत चूक नेमकी कुणाची आहे, हे कळू शकले नाही. मात्र, यात एका अल्पवयीन मुलाचा जीव गेला तर दुसरा जीवन मरणाशी झुंज देत आहे. घटनेची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details