चंद्रपूर - बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन फॅक्टरीमध्ये टाकीत उतरणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीन कामगार गंभीर असल्याची घटना शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) घडली. या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. अखेर मृत कामगाराच्या कुटुंबाने याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन या कंपनीचा सुरक्षा व्यवस्थापक सुधीर मिश्रा याला अटक करण्यात आली आहे.
बामणी प्रोटीन फॅक्टरीमध्ये एका टाकीत विशिष्ट प्रकारचे रसायन ठेवले जाते. त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचा देखील समावेश असतो. ते मशीनद्वारे रिकामे झाल्यावर त्याची दररोज सफाई केली जाते. त्यामुळे दररोज प्रमाणे शुक्रवारी सकाळच्या पाळीत येथील विशाल माऊलीकर हा कामगार रिकाम्या टाकीची सफाई करण्यासाठी उतरला होता. ही टाकी 20 फूट इतकी खोल होती. मात्र, तिथे विषारी वायूची गळती होत होती. यात विशाल कामगार खाली उतरला होता. तो खाली उतरताच बेशुद्ध झाला. त्याला वाचविण्यासाठी बंडू निवलकर (वय 35 वर्षे, रा. बल्लारपूर), शैलेश गावंडे (वय 35 वर्षे, रा. बल्लारपूर) आणि मनोज मडावी (वय 30 वर्षे, रा. बामणी) हे उतरले. हे तिघे देखील तिथेच बेशुद्ध होऊन पडले होते. हे चित्र काही कामगारांना दिसताच त्यांनी या चारही कामगारांना बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका घेऊन त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.
बामणी प्रोटीन फॅक्टरी अपघात प्रकरण; निष्काळजीनाच्या आरोपाखाली सुरक्षा व्यवस्थापकाला अटक
बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन फॅक्टरीमध्ये टाकीत उतरणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीन कामगार गंभीर असल्याची घटना शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थापक सुधीर मिश्रा याला अटक केली आहे.
यात पहिला कामगार विशाल माऊलीकर याचा वाटेतच मृत्यू झाला. तर अन्य तीन कामगारांची स्थिती देखील गंभीर आहे. या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी पुरविण्यात आल्या होत्या की नाही हा देखील हा देखील मोठा प्रश्न आहे होता. बामणी प्रोटीन कंपनीने सुरक्षेचे कोणतेही साहित्य न देता टाकी सफाईसाठी पाठवले असल्याची तक्रार वसंतराव माऊलीकर यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन सुरक्षा व्यवस्थापक सुधीर मिश्रा याला अटक करण्यात आली.
हेही वाचा -चंद्रपूर जिल्ह्यात 25 धान खरेदी केंद्रांना मंजुरी