चंद्रपूर -पंकज लांडगे या युवकाची १९ तारखेला चोर असल्याच्या संशयातून जमावाने मारहाण करून हत्या केली होती. त्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. इतकी धक्कादायक घटना झाल्यानंतरही एकही जबाबदार लोकप्रतिनिधी पंकजच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी पोहचलेला नाही. जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी तब्बल सहा दिवसांनी या कुटुंबाची भेट घेतली. या वेळी त्यांनी पंकजला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पंकज लांडगे हत्या प्रकरण: घटनेच्या सहाव्या दिवशी खासदार धानोरकरांकडून कुटुंबियांचे सांत्वन - Chandrapur Police News
पंकज लांडगे याची जमावाने मारहाण करून हत्या केली होती. त्याच्या कुटुंबाची भेट खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. या वेळी त्यांनी पंकजला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असे आश्वासन दिले.
शहरातील पागलबाबानगर या परिसरात चोरटे फिरतात अशी काही दिवसांपूर्वी अफवा पसरली होती. चोरट्यांच्या भीतीने अनेक लोक रात्र जागून काढत होते. याच दरम्यान 19 डिसेंबरला रात्री साडे आठ वाजता पंकज लांडगे हा आपल्या मित्रासह तेथील एक जणाचा पत्ता विचारायला एका घरी गेला असता तेथील महिलांनी चोर चोर म्हणून आरडाओरड करायला सुरुवात केली. यानंतर या घरातील दोन ते चार व्यक्ती हातात काठ्या घेऊन पंकज आणि त्याच्या मित्राच्या मागे धावू लागले. त्यांनी या दोघांनाही गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली. पंकज आणि त्याचा मित्र वारंवार आपण चोरून नसल्याचे सांगत होते मात्र, जमावा काही ऐकून घेण्यास तयार नव्हता. त्यांना झाडाला दोरीने बांधून ठेवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली ही मारहाण इतकी भीषण होती की यात पंकजला आणि त्याच्या मित्राला गंभीर इजा झाली. रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली असली तरी पोलिसांना तिथे पोहोचायला एक ते दीड तास लागला. या दरम्यान गंभीर दुखापत झाल्याने पंकजचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. याच्यापुढे घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर शहर हादरून गेले. या प्रकरणात पंकजची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होती. इतके गंभीर प्रकरण असताना कोणीही जबाबदार लोकप्रतिनिधी पंकजच्या घरी गेला नाही. याबाबत नागरिकांकडून देखील संताप व्यक्त करण्यात येत होता. घटनेच्या सहा दिवसानंतर खासदार बाळू धानोरकर यांनी लांडगे कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करत पंकजा मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.