चंद्रपूर- ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही गावात वृद्ध शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (गुरूवार) सकाळी उघडकीस आली. विश्वनाथ पांडू गुरूनुले (वय 65 वर्षे) मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या - वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही गावात वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.

मृत विश्वनाथ गुरूनुले
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून स्वतःच्या शेतातील सागवनच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात त्यांची वृद्ध पत्नी आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. तरी घटनेचा पुढील तपास संबंधित विभागाचे पोलीस कर्मचारी करत आहेत.
हेही वाचा - खोडदा नदीवरील बंधाऱ्यात आढळला तरुणाचा मृतदेह