महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंदोलनकर्त्या शीख सामुदायाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल, एकाला अटक - चंद्रपूर शीख सामुदाय बातमी

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात चंद्रपूरच्या एका व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला. या पोस्टचे स्क्रीन शॉट्स शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शीख बांधवांच्या हाती लागले. त्यामुळे शीख समुदाय आक्रमक झाला.

चंद्रपूर
चंद्रपूर

By

Published : Dec 15, 2020, 3:25 PM IST

चंद्रपूर- दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिख समाजाविषयी समाज माध्यमात आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी यात एका आरोपीला अटक केली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात चंद्रपूरच्या एका व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला. या पोस्टचे स्क्रीन शॉट्स शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शीख बांधवांच्या हाती लागले. त्यामुळे शीख समुदाय आक्रमक झाला. रात्रीच रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन शीख बांधवांनी तक्रार करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

चंद्रपूर
या तक्रारीवरून उजाला ग्रुप नामक व्हॉटसअप ग्रुपच्या एका सदस्याला आता अटक करण्यात आली आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत शीख समुदायातील लोक रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या अटकेसाठी ठाण मांडून बसले होते. केंद्राने तीन नवे कृषी कायदे मागे घ्यावे, यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र, विरोधकांकडून आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरातही शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात उजाला नामक व्हाटसअप ग्रुप मागील काही दिवसांपासून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करीत आहे. या ग्रुपचे अ‍ॅडमिन भाजपचे माजी नगरसेवक बलराम डोडानी आहेत. याच ग्रुपवर अरविंद सोनी, हरिकिशन मल्लन (पप्पू मल्लन), बजरंग सिंग आणि प्रदीप भिमनवार नामक व्यक्तींनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या आहेत. हा मजकूर शीख समुदायाच्या हाती पडल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. चंद्रपूर शहरातील सहा गुरुद्वारांच्या प्रमुखांनी एकत्र येत ही तक्रार केली असून आता यावर पोलीस कारवाई सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details