चंद्रपूर- देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे नागरिक समाधानी होते. मात्र, एका संशयित रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यातच चिमूरमध्येही दोन रुग्ण असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये ती केवळ अफवाच असल्याचे चिमूर मदत केंद्राचे डॉ. रवी गेडाम यांनी सांगितले.
'ती' केवळ अफवाच..चिमूरमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही - चंद्रपूर बातमी
चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे नागरिक समाधानी होते. मात्र, एका संशयित रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यातच चिमूरमध्येही दोन रुग्ण असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये ती केवळ अफवाच असल्याचे चिमूर मदत केंद्राचे डॉ. रवी गेडाम यांनी सांगितले.
no-one-tested-positive-in-chumur
हेही वाचा-कोरोना इफेक्ट : रियोमधील येशूच्या भव्य पुतळ्यालाही घातला मास्क!
मुलींच्या शासकीय वस्तिगृहात २१ एफ्रील पासून कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत 3 मे पर्यंत एकूण २८३ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. यात ताप असणारे ५० तर इतर आजाराचे २३३ जणांचा समावेश आहे.