चंद्रपूर - जिल्ह्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात 377 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 119 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 7 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
आज 119 जणांना कोरोना
आज (1 जून) एकूण 1962 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 119 पॉझिटिव्ह, तर 1843 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 119 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुका 11, बल्लारपूर 31, भद्रावती 7, ब्रम्हपुरी 6, नागभिड 4, मूल 7, गोंडपिपरी 3, राजूरा 12, चिमूर 1, वरोरा 1, कोरपना 6 आणि इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील घोट निंबाळा येथील 55 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील पिपरी येथील 52 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील 65 वर्षीय महिला आणि यवतमाळ जिल्ह्यातील इंदिरा चौक वणी येथील 62 वर्षीय महिला, तर 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.