चंद्रपूर - गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 31 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 6 कोरोनाबाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित आलेल्या 31 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 4, ब्रम्हपुरी 1 , नागभिड 3, मूल 1, गोंडपिपरी 2, राजूरा 2, वरोरा 2, कोरपना 1, जिवती 3 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील क्रिष्णानगर येथील 61 वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन परीसरातील 95 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड परीसरातील 70 वर्षीय महिला, ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील 55 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष तर गडचिरोली जिल्हयातील 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
हेही वाचा-Mumbai Corona : धारावी दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तर वर्षभरात सातव्यांदा रुग्णसंख्या शून्यावर
आजतागायत एकूण 1502 बाधितांचे मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 243 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 860 झाली आहे. सध्या 881 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 5 लाख 18 हजार 647 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 31 हजार 827 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1502 बाधितांचे मृत्यू झाले आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1389, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 41, यवतमाळ 52, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
हेही वाचा-Actor Brain Dead राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता संचारी विजयचा अपघाती मृत्यू
प्रशासनाचे आवाहन-
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. तसेच स्वत:ची काळजी घ्यावी. 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.