महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर: 1584 नवीन कोरोनाबाधित; 25 जणांचा मृत्यू - corona patients deaths in Chandrapur

जिल्ह्यात आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 42 हजार 231 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या 30 हजार 650 झाली आहे.

Chandrapur corona update
चंद्रपूर कोरोना अपडेट

By

Published : Apr 19, 2021, 2:45 AM IST

चंद्रपूर- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार हा दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल 1, 584 रुग्णांची नोंद झाली तर 25 जणांचा मृत्यू झाला.
547 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


जिल्ह्यात आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 42 हजार 231 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या 30 हजार 650 झाली आहे. सध्या 10 हजार 981 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 3 लाख 29 हजार 846 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख 80 हजार 149 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

हेही वाचा-कोरोनाच्या कठीण काळात तरी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवावे; एकनाथ खडसे यांनी साधला निशाणा

जिल्ह्यात आजवर एकूण 600 जणांचा मृत्यू-

जिल्ह्यात आजपर्यंत 600 बाधितांचे मृत्यू झाले आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 551, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा दोन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या 1, 584 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 67, बल्लारपूर 96, भद्रावती 124, ब्रम्हपुरी 240, नागभिड 27, सिंदेवाही 17, मूल 55, सावली 22, पोंभूर्णा 5, गोंडपिपरी 7, राजूरा 61, चिमूर 173, वरोरा 140, कोरपना 28, जीवती 5 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा-हृदयद्रावक..! पुण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे -जिल्हाधिकारी
कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details