चंद्रपूर- जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेला यावेळी संधी मिळणार आहे. अध्यक्षपदाबाबत जिल्ह्यात विविध नावे समोर येत आहेत. अशात गोंडपिपरीच्या नेटकऱ्यांनी मात्र धाबा, तोहोगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या वैष्णवी बोडलावार यांच्या नावाला पसंती दिली आहे. वैष्णवीताईंना पक्षाने संधी द्यावी, हा संदेश तालुक्यातील विविध समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे.
गोंडपिपरी तालुका हा मागास व दुर्गम आहे. तालुक्यात कुठल्याही रोजगाराच्या संधी नाहीत. केवळ शेतीवरच येथील ९५ टक्के नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. तालुक्यात गावागावातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. तालुक्यात विविध समस्या आहेत. अशात गोंडपिपरी तालुकावासियांना नेतृत्वाची कुठलीच संधी मिळत नसल्याने या समस्या अजून तीव्र होत आहेत.