महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrapur : वनविभागाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन; वाघाच्या हल्ल्यात झाला होता कामगाराचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन भटारकर यांनी वनविभागाविरोधात ( NCP Protest Against Chandrapur Forrest Department ) आमरण उपोषण पुकारले आहे. परिसरातील वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

By

Published : Feb 18, 2022, 7:14 AM IST

Chandrapur
चंद्रपूर

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात बुधवारी वाघाने एका कामगाराला उचलून नेले होते. त्याचा मृतदेह आढळून आला. या परिसरातील वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मात्र, वनविभागाने यावर कुठलेही पाऊले उचलले नाही. त्यामुळे एका कामगाराचा नाहक बळी गेला, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन भटारकर यांनी ( NCP Protest Against Chandrapur Forrest Department ) वनविभागाविरोधात आमरण उपोषण पुकारले आहे.

वन विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे कामगार व सर्वसामान्यांचे जिव जात असल्याचा आरोप नितीन भटारकर यांनी केला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात वाघ, बिबट व अस्वल यांचा मुक्तसंचार आहे. मागील काही दिवसांपासून येथे वाघाचे नेहमीच दर्शन होत होते. काम करताना रात्री दिवसा या वाघाचा वावर दिसून येत होता. त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वी हिराई अतिथीगृहाजवळ दुचाकीस्वार कामगारांवर वाघाने हल्ला केला होता. ज्यात तो कामगार थोडक्यात बचावला. मात्र, त्याला गंभीर इजा त्यात झाली. त्यापूर्वी उर्जानगर वसाहतीत ऑगस्ट 2020 ला 5 वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांना प्रत्यक्ष भेटून सतत पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु वनविभागातर्फे कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने काल रात्री प्रकल्पात काम करणाऱ्या एका कामगारावर पट्टेदार वाघाने हल्ला करीत ठार केले. वारंवार या क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांचा या प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होत असल्यानंतरही वन विभाग चंद्रपूरतर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाही, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. भविष्यात देखील वनविभागाच्या अशा कार्यप्रणालीमुळे अनेकांचे जिव जाऊ शकतात व म्हणून या क्षेत्रातील पट्टेदार वाघ, बिबटे व अस्वल यांना जेरबंद करण्याकरीता तात्काळ ठोस निर्णय घ्यावे, या मागणीला घेऊन वन विभाग चंद्रपूर यांच्या निषेधार्थ नितीन भटारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

हेही वाचा -Uttar Pradesh Assembly Election : पाच वर्षात पहिल्यांदाच अखिलेश, मुलायमसिंह आणि शिवपाल दिसले एकत्र

ABOUT THE AUTHOR

...view details