चंद्रपूर - 13 नोव्हेंबरला गडचिरोलीतील झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत तब्बल 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. (Naxalite Killed in Gadchiroli) यात जहाल आणि मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचादेखील समावेश होता. (Naxalite Milind telumbde's Journey) मिलिंद तेलतुंबडे याचा नक्षलवादी चळवळीकडे वळण्याचा प्रवास हा चंद्रपूर येथून सुरू झाला.
पार्श्वभूमी -
मिलिंद तेलतुंबडे याचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर या गावात 5 फेब्रुवारी 1964ला झाला. (Milind Teltumbde's Birthday) दहावी आणि आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर तो वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984ला धोपटाळा येथील खुल्या कोळसा खाणीत रुजू झाला. दोन वर्षांनी त्याची बदली चंद्रपूर शहराजवळ असलेल्या पद्मापुर कोळसा खाणीत झाली. आधीच चळवळीत सक्रिय असलेल्या मिलिंद तेलतुंबडेचा संपर्क अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचा राज्य सचिव अॅड. सृजन अब्राहमशी आला. याचवेळी तो नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झाला. त्यानंतर संयुक्त खदान मजदूर संघ, इंडियन माईन वर्किंग फेडरेशन या संघटनांच्या माध्यमातून कामगार चळवळीत आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली.
1994पूर्वी त्याने नवजीवन भारत सभा या संघटनेचे अध्यक्षपद देखील भूषवले. नक्षलसमर्थक बनल्यानंतर त्याने कोळसा खाणींचा पट्टा असलेल्या चंद्रपूर, वणी, उमरेड, नागपूर येथे आपला प्रभाव पाडायला सुरुवात केली. या माध्यमातून नक्षली विचारसरणीचा प्रसार तो करू लागला. तेलतुंबडे याने संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात एक मोठे कामगार आंदोलन उभारले. याला हिंसक वळण लागले होते. तेव्हाच तो पोलिसांच्या रडारवर आला. नक्षलसमर्थक असल्याची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली. यानंतर वेकोली कोळसा खाणीतील गणपत नावाचे अधिकारी होते. ज्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. आरोपी म्हणून मिलिंद तेलतुंबडे याचे नाव समोर आले. याचवेळी तो फरार झाला आणि तो थेट गडचिरोली येथे नक्षली चळवळीत सामील झाला. (Milind Teltumbde Joined Naxalite moment)