चंद्रपूर- माझ्या वडीलांनी सांगीतले होते की विकासाची लक्ष्मी घरा-घरात पोहचवायची आहे. टाटा-बाय हाताच्या पंज्यात लक्ष्मी वसत नाही. जंगलात फिरणाऱ्या धनुष्यबाणावर सुद्धा लक्ष्मी वसत नाही आणी ज्यांच्या घडाळ्याचे बारा वाजले आहेत त्यांचे बद्दल काय बोलायचे. लक्ष्मी फक्त कमळाच्या फुलावरच वसते त्यामूळे विकासाची लक्ष्मी कमळच घराघरात पोहचवू शकते, असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी केले.
हेही वाचा - क्रिकेटच्या वाघाचा ताडोबाला निरोप
चिमूर तालुका महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक सभागृह, चिमूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार पूनम महाजन बोलत होत्या.
यावेळी बोलताना खासदार पूनम महाजन म्हणाल्या, प्रमोद महाजन यांनी भाजपचा वटवृक्ष वाढवत असताना याच चिमूर शहरात एका सभेत 5 कार्यकर्त्यांपासून सुरू केलेले भाषण आज त्यांची मुलगी म्हणून 50 हजार कार्यकर्त्यांना संबोधत आहे. भाजपचे विचार वाढविण्याचे काम केल्याने, हजारोंच्या संख्येने आलेल्या महिला भगिनी हीच या भाजपची ताकत आहे. महिलांच्या आरोग्यासाठी चूल मुक्त करण्याचे धोरण व स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महिला कशा सक्षम राहतील यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करत विविध योजना दिल्या. त्यामुळे महिलांना सन्मान मिळाल्याचे त्या म्हणाल्या.