चंद्रपूर -कोविड १९ रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडिसिवीरचे इंजेक्शन व पीपीई सरकारने निर्धारित केले आहेत. निश्चित दरातच सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येत असून ही बाब खासगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर विशेष पथके निर्माण करून लूट थांबविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगर पालिका आयुक्त यांना केल्या.
आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयासाठी रेमडिसिवीरच्या १०० मिलिग्रॅम इंजेक्शनच्या एक कुपीची किंमत २३६० रुपये व पीपीई किटचे १० दिवसाचे ४५०० रुपये याप्रमाणे दर निश्चित केली असून, प्रत्येक जिल्ह्यात नेमून दिलेल्या औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.