महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrapur Railway उद्योगांसाठी रेल्वे मात्र प्रवासी 27 वर्षांपासून वंचित, खासदार धानोरकरांनी रेल्वे मंत्र्यांकडे मांडली व्यथा

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली हे जिल्हे नक्षलप्रभावित जिल्हे ( Naxal Affected District Maharashtra 2022) आहेत. या जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणी आहेत. उद्योगासाठी या परिसरातून रेल्वे जाते, मात्र प्रवाशांसाठी रेल्वे नसल्याची अडचण खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मांडली. यावेळी रेल्वे प्रवाशांसाठी काही रेल्वे गाड्यांना चंद्रपुरात थांबा देण्याची मागणीही खासदार बाळू धानोरकरांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

Chandrapur Railway
खासदार बाळू धानोरकर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

By

Published : Dec 16, 2022, 12:56 PM IST

चंद्रपूर - यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात रेल्वेबाबत ( Chandrapur Railway Passenger Issues) अनेक समस्या आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ह्या समस्या कायम आहेत. या परिसरात उद्योगांसाठी रेल्वे ( Indian Railway For Business ) आहे, मात्र प्रवासी 27 वर्षांपासून वंचित असल्याची व्यथा खासदार बाळू धानोरकर ( Mp Balu Dhanorkar Meet Railway Minister Ashwini Vaishnav ) यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे मांडली.

रेल्वे प्रवासी 27 वर्षांपासून वंचितचंद्रपूर लोकसभा ( Chandrapur Lok Sabha Constituency ) क्षेत्राला तेलंगणा राज्याची सीमा ( Telangana State Border ) लागून आहे. या भागात राजुरा, गडचांदूर क्षेत्र मागील अनेक दिवसांपासून समस्यांनी ग्रस्त आहे. तालुक्यातील सिमेंट उद्योगांसाठी ( Cement industry In Chandrapur ) दिल्ली चेन्नई रेल्वे मार्गावर चुनाळा, राजुरा, अवरपूरपर्यंत रेल्वे लाईनचे निर्माण 27 वर्षांपूर्वी झाले होते. त्या मार्गावर केवळ कोळसा आणि सिमेंट वाहतूक करण्यात येते. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही, याकडे देखील खासदार बाळू धानोरकर ( Mp Balu Dhanorkar ) यांनी लक्ष वेधले.

या गाड्यांना थांबा देण्याची मागणीकाझीपेठ - पुणे एक्स्प्रेस ( Kazipeth - Pune Express ) आठवड्यातून तिन दिवस सुरु करणे, भाग्यनगरी एक्सप्रेस सिकंदराबाद ( Bhagyanagar Express Secunderabad ) ते बल्लारशाह - सिकंदराबाद सुरु करणे, बल्लारपूर- भुसावळ सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस (५११९६) पूर्ववत सुरु करणे, नागपूर - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, बल्लारपूर जबलपूर व्हाया नागभीड इंटरसिटी एक्प्रेस, बल्लारपूर - मूल- नागभीड- ब्रम्हपुरी- गोंदिया रेल्वे मार्गावरील अंडरपास पावसाळ्यात शेतकऱ्यांना आवागमन करण्यास त्रासदायक ठरतात. त्याबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करणे, राजुरा - असिफाबाद- हैदराबाद मार्गावर रेल्वे गेट नं. LC No 3.0H व विरून स्टेशन महाराष्ट्र पोल नं. 159/17 जवळ अंडरपास तयार करणे, गडचांदूर चुनाळा वरून नागपूर शटल रेल्वे सुरु करणे, भांदक रेल्वे स्टेशन वर दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं. 12721 / 12722, मद्रास जम्मुतवी एक्सप्रेस ट्रेन नं. 16031/16032, मद्रास- लखनौ एक्सप्रेस ट्रेन नं. 18093/ 16094, मद्रास जोधपूर एक्सप्रेस ट्रेन नं. 22663 / 22664, दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेस ट्रेन नं. 12791/12792, पेरणाकुलम पटणा एक्सप्रेस ट्रेन नं. 16359, नवजिवन एक्सप्रेस ट्रेन नं 12656 / 12657, अँड ट्रक एक्सप्रेस ट्रेन नं. 12615/12616, हिसार एक्सप्रेस ट्रेन नं. 22737 या गाडयांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गो राउंड ट्रेनची मागणीमहाराष्ट्र राज्यातील विदर्भ क्षेत्रात येणारा चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल आहे. नक्षल प्रभावित ( Naxal Affected Area In Chandrapur ) असल्याने विकासाची कामे पाहिजे, तशी या जिल्ह्यात होऊ शकली नाहीत. येथे राज्य परिवहन सेवेची बस सेवा चालते. मात्र, राज्य परिवहन मंडळ नेहमीच तोट्यात असतो. ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधा सुरू करण्यासाठी गो राऊंड ट्रेन मध्य रेल्वे व दक्षिण - पूर्व - मध्य रेल्वेने बल्लारपूर स्टेशन येथून सुरू करून चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम, नागपूर, भंडारा, गोंदिया, वडसा, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, चंद्रपूर - बल्लारशा अशी सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकरांनी केली आहे.

तर या भागात होणार भरभराटदक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारा जबलपूर ते चंद्रपूर नवीन गाडी सुरू झाली आहे. ही गाडी चंद्रपूर ऐवजी बल्लारपूरपर्यंत (02274-02273) सुरू झाल्यास बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर येथील प्रवाशांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे महसुलात देखील मोठी वाढ होऊ शकते. अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक, माणिकगड आदी उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहेत. ही गाडी सौंदड, अर्जुनी, वडसा, नागभीड, मुल आणि मारोडा या स्थानकावर थांबल्यास अनेक प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकतो. याकडेदेखील मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details