महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' नरभक्षक वाघाला गोळ्या घालून ठार करा; खासदार धानोरकरांची वनमंत्र्यांकडे मागणी

मागील दोन वर्षांपासून राजुरा-विरुर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातलेला आहे. या वाघाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला असून अनेकांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. यामुळे या वाघाला गोळ्या घालून ठार करण्याची मागणी खासदार धानोरकरांनी केली आहे.

वाघ
वाघ

By

Published : Oct 10, 2020, 8:54 PM IST

चंद्रपूर - राजुरा-विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातला आहे. मागील दोन वर्षात या वाघाने तब्बल नऊ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या परिसरात वाघाविषयी संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या वाघाला त्वरित ठार करा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा देखील केली आहे.

राजुरा-विरुर वनपरिक्षेत्रात मागील २२ महिन्यांपासून नरभक्षी वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. यात नऊ निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेला, तर तीन शेतकऱ्यांना या वाघाने गंभीर जखमी केले आहे. नागरिकांचा वाढता रोष बघता वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यापार्श्वभूमीवर दीडशेच्या जवळपास कॅमेरे या परिसरात लावण्यात आले आहेत. वनकर्मचाऱ्यांचे पथक दिवसरात्र नरभक्षी वाघाचा शोध घेत आहे. मात्र, अजूनही या वाघाचा थांगपत्ता लागलेला नाही.

हेही वाचा -'गुन्हे घडतच असतात, त्यांना मोदी रोखू शकत नाहीत' काँग्रेस नेत्याचे बेताल वक्तव्य

जवळपास २१ गावे या वनपरिक्षेत्रात येतात. या भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे. या क्षेत्रात कापूस, धान, सोयाबीन इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वाघाच्या दहशतीत शेतकरी घाबरलेल्या स्थितीत आहेत. जीव मुठीत घेऊन शेतकरी कामे करीत आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी काही दिवसांपासून वनविभागाने पथके तयार केली आहेत. मात्र, वनविभागाच्या तावडीत नरभक्षी वाघ सापडला नाही. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेत वनविभागाला सपशेल अपयश आले आहे.

दरम्यान, शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्य वन संरक्षक एन. प्रवीणकुमार यांच्यासह वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर वनमंत्री राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. या चर्चेत त्यांनी राजुरा वनपरिक्षेत्रातील नरभक्षी वाघाने आजवर घेतलेल्या बळींची माहिती दिली. दरम्यान, या नरभक्षी वाघाला गोळ्या झाडा. अशी मागणी त्यांनी चर्चेत केली आहे.

हेही वाचा -'अजित पवारांना दाखवून द्या, आम्ही पण तुमचे बाप आहोत'

ABOUT THE AUTHOR

...view details