चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. जिल्ह्यात शनिवारी तब्बल 640 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 16 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात 194 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 32 हजार 592 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 454 झाली आहे. सध्या 4657 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 98 हजार 710 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 60 हजार 434 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 481 बाधितांचे मृत्यू
शनिवारी मृत्यू झालेल्यामध्ये गडचांदूर येथील 39 वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष, ट्रेझरी कॉलनी येथील 87 वर्षीय महिला, बाबुपेठ येथील 55 वर्षे पुरुष, महाकाली वार्ड येथील 59 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी येथील 56 वर्षीय महिला, वोल्टास सागर कॉलनी, वरोरा येथील 58 वर्षीय पुरुष, नेताजी वार्ड चीमूर येथील 41 वर्षीय महिला, पांजरेपार चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, कृष्णानगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुष, बुटीबोरी नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 73 वर्षीय महिला, हार्डोना ता. राजुरा येथील 37 वर्षीय पुरुष, राधे गाव तालुका गोंडपिंपरी येथील 45 वर्षीय पुरुष, नेहरू वार्ड चिमूर येथील 78 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.