महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात आज 637 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, पाच जणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 637 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 7, 2021, 8:17 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात मागील 24 तासांत 637 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे. 288 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 30 हजार 500 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 700 झाली आहे. सध्या 3 हजार 353 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 88 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 53 हजार 825 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर येथील 67 वर्षीय पुरूष, शिवाजीनगर तुकुम येथील 74 वर्षीय पुरूष व सिस्टर कॉलनी येथील 68 वर्षीय पुरूष, यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील 58 वर्षीय पुरूष व मारेगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 447 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 405, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 18, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज (दि. 7 एप्रिल) बाधीत आलेल्या 637 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 190, चंद्रपूर तालुका 37, बल्लारपूर 38, भद्रावती 54, ब्रम्हपुरी 25, नागभिड 25, सिंदेवाही 10, मूल 21, सावली 12, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी आठ, राजूरा 13, चिमूर 48, वरोरा 102, कोरपना 34, जीवती तीन व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा -चंद्रपूरकरांनो हे घ्या फुकटचे प्रदूषण; जिल्हा प्रशासनाने बंद करण्याचे आदेश देऊनही 23 कोळसा डेपो सुरूच

ABOUT THE AUTHOR

...view details