महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात एका आठवड्यात शंभर डुकरांचा संशयास्पद मृत्यू; चौकशीची मागणी

वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना मागील एक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घराजवळ डुक्कर मृत झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. अचानक मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे देशमुख यांनी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तेव्हा एकट्या वडगाव प्रभागात आठवड्याभरात 35 ते 40 डुक्कर मरण पावल्याची माहिती त्यांना मिळाली.

By

Published : Mar 20, 2021, 6:56 AM IST

Updated : Mar 20, 2021, 9:53 AM IST

शंभर डुकरांचा संशयास्पद मृत्यू
शंभर डुकरांचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपूर - शहरात मागील काही दिवसांत जवळपास शंभर डुकरांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डुकरांमध्ये साथीचा रोग पसरला आहे का? अथवा अन्य काही बाब आहे, याची शहानिशा होणे आवश्यक आहे. याबाबत नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपा आयुक्त यांना पत्र लिहून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शंभर डुकरांचा संशयास्पद मृत्यू; चौकशीची मागणी

आठवड्यात १०० डुकरांचे मृत्यू-

मागील एक आठवड्यात चंद्रपूर शहरात जवळपास १०० डुकरांचा मृत्यू झालेला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या तीन झोन मध्ये मृत पावलेली डुकरे उचलण्यासाठी आलेल्या तक्रारीच्या आधारावर ही माहिती मिळालेली आहे. वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना मागील एक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घराजवळ डुक्कर मृत झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. अचानक मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे देशमुख यांनी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तेव्हा एकट्या वडगाव प्रभागात आठवड्याभरात 35 ते 40 डुक्कर मरण पावल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी मनपाच्या तीनही झोन मधून माहिती घेतली असता सुमारे १०० डुकरांचा एका आठवड्यात मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली.

मृत्यूच्या कारणाचा शोध घेणे गरजेचे-

एका आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर डुकरांचा मृत्यू होणे सामान्य बाब नाही. डुक्कर मारण्यासाठी विषारी औषध देणे किंवा डुक्करांमध्ये साथीचा आजार असणे, अशी कारणे यामागे असू शकतात. डुक्करांमध्ये साथीचा आजार पसरणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक होऊ शकते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे हीत लक्षात घेता डुकरांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे, यासाठी तज्ञ पशुवैद्यकीय वैद्यकीय चिकित्सकांकडून शहानिशा करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक देशमुख यांनी केली आहे. या सदंर्भात त्यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते व उपायुक्त विशाल वाघ यांना पत्र देिले आहे.

Last Updated : Mar 20, 2021, 9:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details