महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोर असल्याच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू - चोर समजूर मारहाण

पंकज लांडगे आणि त्याचा मित्र अविनाश आपल्या थकीत उधारीच्या वसुलीसाठी पागल बाबानगर या भागात रात्री साडेदहा वाजता गेले. त्यांनी एका घरी जाऊन उधारी असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरातील नागरिकांनी त्यांना चोर समजून पकडले.

संशयातून दोघांना बेदम मारहाण
संशयातून दोघांना बेदम मारहाण

By

Published : Dec 20, 2019, 7:56 PM IST

चंद्रपूर - शहरातील पागल बाबानगर परिसरात चोर समजून नागरिकांनी दोन तरूणांना बेदम मारहाण केली. अविनाश कल्लो आणि पंकज लांडगे अशी या तरूणांची नावे आहेत. यातील पंकज लांडगे (वय-24) या तरूणाचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेबाबत पोलीसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

संशयातून दोघांना बेदम मारहाण


शहरातील बल्लारपूर बायपास वळण परिसरात चोर फिरत असल्याच्या अफवेने मागील काही दिवस नागरिक त्रस्त आहेत. पंकज लांडगे आणि त्याचा मित्र अविनाश आपल्या थकीत उधारीच्या वसुलीसाठी पागल बाबानगर या भागात रात्री साडेदहा वाजता गेले. त्यांनी एका घरी जाऊन उधारी असलेल्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरातील नागरिकांनी त्यांना चोर समजून पकडले.

हेही वाचा - बाळासाहेब असते तर स्मारकासाठी झाडं तोडणाऱ्यांचे....

त्यानंतर घरातील लोक आणि शेजाऱ्यांनी पकडलेल्या तरूणांना एका झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊपर्यंत ही मारहाण सुरू होती. या जखमी तरूणांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, पंकज लांडगे याने रस्त्यातच प्राण सोडले.


याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या लोकांपैकी चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरू केला असून यामागचे नेमके कारण शोधले जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी दिली.


पागलबाबा नगर परिसरात मागील दिवसांपासून चोर फिरत असल्याच्या अफवेने नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांनी देखील विविध पथकं स्थापन करून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही मारहाणीची घटना घडली, असे नांदेडकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details