चंद्रपूर :एका किरकोळ वादातून जमावाने फळ व्यापाऱ्यांना मारहाण केल्याची घटना आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. मिळालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओत जमाव दिसून येत आहे. या प्रकरणात चार जणांना मारहाण केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही पक्षाने एकमेकाविरोधात तक्रार केली आहे.
जमावाची फळ व्यापाऱ्यांना मारहाण; चंद्रपूर बाजार समितीमधील प्रकार - Chandrapur crime news
एका किरकोळ वादातून जमावाने फळ व्यापाऱ्यांना मारहाण केल्याची घटना आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. मिळालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओत जमाव दिसून येत आहे. या प्रकरणात चार जणांना मारहाण केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मुक्तियार खान यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांचे ठोक दुकान आहे. काल सकाळी या बाजार समितीत दोन ऑटोचालकांचा वाद झाला. यात मुक्तियार खान हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांचीही काही लोकांशी बाचाबाची झाली. हा वाद तेवढ्यापुरता निवळला होता. मात्र, आज सकाळी एक जमाव मुक्तियार खान आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यासाठी आला. या झटापटीत मुक्तियार खान यांची दोन मुले साबीर खान, सोहेल खान आणि त्यांचे मेव्हणे सलीम शेख यांना मारहाण करण्यात आली.
यावेळी जमावातील लोक त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवेमारण्याची धमकी देत होते. असे मुक्तियार खान यांचे म्हणणे आहे. ही घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे हे देखील याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार आहेत. रामनगर पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.