महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरातील जीआरएन कंपनीत मनसेचा राडा; स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी - जीआरएन कंपनीत मनसेकडून तोडफोड

दुर्गापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भटाळी येथे वेकोलीची कोळसा खाण आहे. येथे जीआरएन ही कंपनी कोळसा खाणीवर खोदकाम करते. या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा अशी मागणी मनसेची होती.

mns
चंद्रपुरातील जीआरएन कंपनीत मनसेकडून तोडफोड

By

Published : Feb 17, 2021, 5:43 PM IST

Updated : Feb 17, 2021, 6:14 PM IST

चंद्रपूर - सरकारी कोळसा कंपनी WCL (western coalfield limited)अंतर्गत काम करणाऱ्या जीआरएन कन्सट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात मनसेने राडा केला. यात ऑफिसची पूर्णपणे तोडफोड केली. स्थानिकांना रोजगार देण्यात ही कंपनी कुचराई करत असल्याचा आक्षेप घेत ही तोडफोड करण्यात आली.

जीआरएन कंपनीत मनसेचा राडा

स्थानिकांना रोजगार देण्याची मनसेची मागणी

दुर्गापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भटाळी येथे वेकोलीची कोळसा खाण आहे. येथे जीआरएन ही कंपनी कोळसा खाणीवर खोदकाम करते. या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा अशी मागणी मनसेची होती. याबाबत अनेक निवेदने दिली मात्र, कंपनीने याला जुमानले नाही असा आरोप मनसेचा आहे. यामुळेच आज मनसेचे शहरप्रमुख मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात अनेक मनसे कार्यकर्ते कंपनी कार्यालयात धडकले. यावेळी अधिकारी गैरहजर होते. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली.

हेही वाचा -कोर्टात बघून घेईन ही धमकी नव्हे, न्यायालयाचा निर्णय

कार्यालयाची तोडफोड

कंपनीच्या आवारात असलेली वाहने, फर्निचर, कंम्प्युटर, एलसीडी, टेबल, खुर्ची, सीसीटीव्ही, कार्यालयातील काचा, खिडक्या अशा सर्व वस्तूंचा अक्षरशः चुराडा करण्यात आला. स्थानिकांना रोजगार न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनदीप रोडे हे या घटनेनंतर पसार झाल्याची माहिती आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -पुणेकरांसाठी खुशखबर! दिवसभर एसी बसमधून अवघ्या 10 रुपयात फिरता येणार

Last Updated : Feb 17, 2021, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details