चंद्रपूर - शहरातील मूल महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला चक्क दुचाकीवर बसवून खड्ड्यांची सफर घडविण्यात आली. मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी हे अनोखे आंदोलन केले.
चंद्रपुरात मनसेने घडविली महामार्ग अधिकाऱ्याला खड्ड्याची सफर हे ही वाचा -कामगार कल्याण अधिकांऱ्याची टोलवाटोलवी; नोंदणीकृत कामगारांमध्ये असंतोष कायम
चंद्रपूर शहरातून जाणारा मूल रोड हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. मात्र, या रस्त्यावर सावरकर चौक ते एमईएल कंपनीपर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहे. खड्डे आणि त्यामधून उडणारी धूळ यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी महामार्ग प्रकल्प कार्यालयात समस्यांचे निवेदन दिले. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी असलेल्या अशोक मत्ते यांना मनसेकडून खड्ड्यांची सफर घडविण्यात आली. यानंतर महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरु करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.
हे ही वाचा -खबरदार! वनक्षेत्रात जनावरे न्याल तर.. ; वनविभागाची गुराख्यांना तंबी