महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhadrawati Police : भद्रावतीमधील 'त्या' मृत तरुणीची ओळख पटली; तीन जण ताब्यात

भद्रावती (Bhadrawati) येथे 22 वर्षीय तरुणीचे शीर नसलेला मृतदेह (Missing Girl Deathbody) मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. या संबंधात पोलिसांनी तपास करूनही काही ठोस आढळले नव्हते. या तरुणीची ओळख होत नव्हती. अखेर या तरुणीची ओळख पटली आहे.

Bhadrawati crime
घटनास्थळाचा फोटो

By

Published : Apr 9, 2022, 4:18 PM IST

चंद्रपूर - 4 एप्रिलला भद्रावती (Bhadrawati) येथे 22 वर्षीय तरुणीचे शीर नसलेला मृतदेह (Missing Girl Deathbody) मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. या संबंधात पोलिसांनी तपास करूनही काही ठोस आढळले नव्हते. या तरुणीची ओळख होत नव्हती. अखेर या तरुणीची ओळख पटली आहे. ही तरुणी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एका गावातील असल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

अज्ञात व्यक्तीने सदर तरुणीचा खून करून तिची ओळख पटू नये म्हणून तिचे मुंडके शरीरापासुन वेगळे करून तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात व्यक्तीविरुध्द १४१/२०२२ कलम ३०२ , २०१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात आला. सदर घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ भेट देवून मृतदेहाची व परिसराची पाहणी केली.

मृतदेह निर्जनस्थळी मुंडके नसलेल्या नग्न अवस्थेत होता -आरोपीने मयताची ओळख पटू नये म्हणुन तिचे शिर कापून नेले तसेच कपडेसुद्धा काढून घेऊन गेला अशा अवस्थेत कोणत्याही प्रकारचे पुरावे, खुणा, निशानी नसल्यामुळे सदर मृत तरुणीची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हाण होते. स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेलमधील सायबर एक्सपर्ट यांच्या मदतीने मृत तरुणीच्या शरीरावरील खुणा, मृतदेहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू यांची शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्ह्यातुन या वयाच्या हरवलेल्या / पळून गेलेल्या तरुणींची शहानिशा केली. परंतु उपयुक्त माहिती मिळून आली नाही. घटना घडून काही दिवस होवून हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रीक तपास केला. तसेच गोपनिय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. त्यामध्ये पोलिसांना यश आले.

आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान -गोपनिय माहितीदाराकडून सदर तरुणीची ओळख पटवण्यात आली. तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. त्यावरुन तिच्या राहत्या घराचा रामटेक जिल्हा नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला. त्यावरून तिची मोठी बहीण हिच्याशी संपर्क साधून ओळख पटवण्याची खात्री करण्यात आली. तिच्या बहीणीने तिच्या शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तू पाहून मृत तरुणी ही तिची बहीण असल्याची खात्री केली. सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन, सायबर सेलचे विविध पथक पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात तपास करीत आहेत. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, लवकरचं या आव्हानात्मक गुन्ह्याचा पर्दाफाश होणार, अशी माहिती आहे. सदर तरुणीला एका ठिकाणी खून करत तिचे शीर कापण्यात आले, नंतर त्या तरुणीचा मृतदेह भद्रावती येथे टाकून आरोपी पसार झाले, अशी माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details