चंद्रपूरMillet Khichadi Record :विष्णू मनोहर हे ख्यातनाम शेफ आहेत. यापूर्वी देखील त्यांनी विश्वविक्रम केले आहेत. 2023 हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष' म्हणून जाहीर केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी 12 बारा विक्रम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार त्यांनी यापूर्वी नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे विक्रम केला. यापूर्वी त्यांनी नागपुरात 6500 किलोची खिचडी तयार केली होती. आज चंद्रपूर येथे हा विक्रम मोडीत काढत त्यांनी 6750 किलोची खिचडी तयार केली.
अयोध्येत होणार सर्वांत मोठा विश्वविक्रम :अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणाच्या वेळी आतापर्यंतचा सर्वांत मोठा विक्रम होणार आहे, अशी माहिती शेफ मनोहर यांनी दिली.
आठ हजार किलो हलवा बनणार :अयोध्या येथे तब्बल आठ हजार किलोचा हलवा तयार करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी दिली. चंद्रपूर येथे विक्रमासाठी दहा बाय दहाच्या लोखंडी कढईचा उपयोग करण्यात आला. मात्र, अयोध्येसाठी तब्बल 15 फूट बाय 15 फूट इतकी मोठी कढई असणार आहे.