चंद्रपूर - तेलंगाणा राज्यातून छुप्या पद्धतीने मजुरांना घेऊन छत्तीसगडला जाणारे तीन कंटेनर सावली पोलिसांनी पकडले. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आज(मंगळवार) पहाटे करण्यात आली. यात 68 मजूर आणि तीन चालक अशा 71 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
मजुरांना घेऊन जाणारे तीन कंटेनर सावली पोलिसांनी पकडले, गडचिरोली सीमेवर कारवाई - lock down in chandrapur
गडचिरोली सीमेवर मंगळवारी सकाळी तीन कंटेनर पकडण्यात आले. रात्री प्रवास करून हे सर्व कंटेनर छत्तीसगड राज्यात जात होते. यामध्ये 68 मजूर होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
संचारबंदीमुळे तेलंगाणामध्ये अडकलेल्या मजुरांनी आता आपल्या स्वगावी परतण्यासाठी मिळेल तसा प्रवास सुरू केला आहे. हा पूर्ण प्रवास चंद्रपूर मार्गाने होत असल्याने एकही कोरोनाचा रुग्ण नसलेल्या जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. हे मजूर समूहाने पायदळ, मिळेल त्या साधनाने प्रवास करत आहेत. अशातच काही मजूर आता कंटेनरमधून प्रवास करताना आढळून आले. आज सकाळी तीन कंटेनर पकडण्यात आले. रात्री प्रवास करून हे सर्व कंटेनर छत्तीसगड राज्यात जात होते. यामध्ये 68 मजूर होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक मस्के आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप नितनवे यांनी केली.