चंद्रपूर- कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला असला तरी कुठली गरज अत्यावश्यक होईल याचा काही नेम नाही. अशीच एक गरज पोलिसांना लागली. गस्तीवर असलेले वाहन पंक्चर झाले आणि एका दुकानदाराला त्यासाठी बोलविण्यात आले. पोलिसांच्या मदतीसाठी तो लगबगीने धावून गेला खरा मात्र परत येत असताना याच पोलिसांनी त्याला अडवले आणि बाहेर फिरतो म्हणून चांगलाच दम दिला. ही गोष्ट त्याच्या अत्यंत जिव्हारी लागली आणि तेव्हापासून त्याने पोलिसांचे वाहन पंक्चर दुरुस्त करण्यावर थेट बहिष्कार घातला. आता तो येणाऱ्या सर्व ग्राहकांचे पंक्चर दुरुस्त करतो मात्र पोलीस दिसताच दुकान बंद असल्याचे सांगतो. या मजेशीर किस्स्याची आता चांगलीच चर्चा होत आहे.
पोलिसांना मदत करणाऱ्या पंक्चरवाल्याची पोलिसांनीच काढली 'हवा' - curfew
पोलिसांच्या मदतीसाठी तो लगबगीने धावून गेला खरा मात्र परत येत असताना याच पोलिसांनी त्याला अडवले आणि बाहेर फिरतो म्हणून चांगलाच दम दिला. आता तो सामान्य ग्राहकांच्या पंक्चर दुरुस्त करून देतो मात्र पोलीस आले तर सरळ दुकान बंद असल्याचे सांगतो.
जायद अन्सारी हा युवक शहरातील तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोल पंपावर पंक्चर काढण्याचे काम करतो. काल शुक्रवारी त्याला वाहतूक शाखेच्या कार्यालयातून फोन आला. पोलिसांचे गस्त घालणारे वाहन पंक्चर झाल्याने त्याला दुरुस्ती करण्यासाठी बोलविण्यात आले, तो गेलाही. पंक्चर बनवून परत येत असतानाच पोलीस मैदानाजवळ त्याला पोलिसांनी रोखून विचारपूस केली. आपण तुमच्याच वाहनांचे पंक्चर दुरुस्त करण्यासाठी गेलो असल्याचे त्याने प्रामाणिकपणे सांगितले. मात्र, यानंतरही समाधान न झालेल्या पोलिसांनी त्याला चांगलाच मार दिला. यामुळे त्याचा पारा अनावर झाला आणि त्याने पोलिसांच्या वाहनांचे पंक्चर बनवण्यावरच बहिष्कार घातला. आता तो सामान्य ग्राहकांच्या पंक्चर दुरुस्त करून देतो, मात्र पोलीस आले तर सरळ दुकान बंद असल्याचे सांगतो.