चंद्रपूर- जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या वरवट गावात एका चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली. दिक्षांत कावडे, असे या मुलाचे नाव असून मामानेच डोक्यावर काठी मारून त्याचा जीव घेतला आहे. दिक्षांत अंगणात खेळत असताना संबंधित प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. रंगनाथ गेडाम, असे हल्लेखोर मामाचे नाव आहे.
मामाच ठरला कर्दनकाळ, चार वर्षाच्या भाच्याची हत्या - chandrapur crime news
वरवट गावात एका चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली. दिक्षांत कावडे, असे या मुलाचे नाव असून मामानेच डोक्यावर काठी मारून त्याचा जीव घेतला आहे.
रवट गावात एका चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या
घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपी रंगनाथ गेडाम(वय-40) याला बांधले आणि मारहाण केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. चिमुरड्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. मात्र, अद्याप या हत्येमागील कारण अस्पष्ट आहे.