महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrapur Cooperative Bank Recruitment : चंद्रपूर जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती, आधी संचालक मंडळाची निवडणूक घेण्याची मागणी - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ( Chandrapur District Bank ) संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. याच दरम्यान जिल्हा बँकेने मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत नोकरभरती काढली. मात्र, सहकार पणन विभागाने या नोकरभरतीला स्थगिती ( Marketing Department order to stop chandrapur cooperative bank recruitment ) दिली आहे.

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती

By

Published : May 12, 2022, 7:39 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ( Chandrapur District Bank ) संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. याच दरम्यान जिल्हा बँकेने मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत नोकरभरती काढली. मात्र, सहकार पणन विभागाने या नोकरभरतीला स्थगिती ( ) दिली आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्याने आधी संचालक मंडळाची निवडणूक घ्या, नंतरच नोकरभरती करा अशी स्पष्ट सूचना राज्याचे विशेष कार्यकारी अधिकारी व सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी जिल्हा बँकेला दिली आहे. ( Marketing Department order to stop chandrapur cooperative bank recruitment )

राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ३६० पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली होती. परंतु याआधीच्या दोन नोकरभरती या अत्यंत वादग्रस्त ठरल्या. याच प्रकरणात तत्कालीन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांचे पद गेले तसेच त्यांना तुरुंगात जावे लागले होते. बॅंकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ आता पूर्ण झाला आहे. बॅंकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देवून या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत केली होती.

आता विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक महाराष्ट्र शासन यांनी या भरतीला स्थगिती दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती सोबत गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील बँकेच्या देखील समावेश आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ आधीच संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जून २०२१ रोजी दिलेल्या आदेशात कार्यकाळ संपलेल्या बॅंकांवर प्रशासक नियुक्त करुन निवडणुक घेण्याचे आदेश दिले आहे. परंतु चंद्रपूर मध्यवर्ती बॅंकेवर अद्याप प्रशासक नियुक्त झाला नाही. हा मुद्दा खासदार धानोरकरांनी लोकसभेत उचलला.

बॅंकेचे मुख्याधिकारी कल्याणकार यांच्यावर यापूर्वीच बॅंकेतील घोटाळा प्रकरणात दोन फौजदारी खटले दाखल आहेत. अशी पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्याला या जबाबदार पदावर घेऊ नये, असे रिजर्व बॅंक, नाबार्ड, सहकार विभागाचे निर्देश होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करुन बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाने त्यांना मुदत वाढ दिली. यावर देखील खासदार धानोरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर सहकार विभागाने नोकरभरतीला स्थगिती दिली आहे. चंद्रपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्या बँकेच्या नोकरभरतीला देखील स्थगिती देण्यात आली आहे.

हेही वाचा -Rajya Sabha Election 2022 : राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक, कोणाला मिळणार पुन्हा संधी, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details