चंद्रपूर -कोरपना तालुक्यातील आसन खुर्द येथे आज शनिवारी मुलाने आपल्या वडिलांचे घर जाळून स्वतः विष घेतल्याची घटना घडली. रामा मारोती पेंदोर (30) असे मारहाण केलेल्या मुलाचे नाव आहे.
वडिलाचे घर पेटवले -
चंद्रपूर -कोरपना तालुक्यातील आसन खुर्द येथे आज शनिवारी मुलाने आपल्या वडिलांचे घर जाळून स्वतः विष घेतल्याची घटना घडली. रामा मारोती पेंदोर (30) असे मारहाण केलेल्या मुलाचे नाव आहे.
वडिलाचे घर पेटवले -
रामाने वडील मारोती पेंदोर यांच्याशी इंजापूर येथे भांडण केले. तुम्हाला जीवे मारतो, म्हणून कुऱ्हाड घेऊन फिरत होता. दरम्यान, आसन खुर्द येथे येऊन वडिलाचे घर पेटवले. यात सर्व वस्तू भस्मसात झाल्या. परंतु घर गावापासून दूर असल्यामुळे आग पसरली नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना आरोपी कुऱ्हाड हाती घेऊन उभा असल्याचे दिसले. तसेच त्याने उंदीर मारायचे केक खाल्याचे आढळून आले. त्यानंंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी गडचांदूर येथे नेले.
हेही वाचा - मुंबई: अश्लील प्रँक व्हिडिओमधून ४ महिन्यात २ कोटींची कमाई; तीन यूट्यूबरला अटक