महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! पीठगिरणीत अडकल्याने धडापासून मुंडके झाले वेगळे; चंद्रपुरातील घटना - chandrapur flour mill incident

धान्य दळण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या खांद्यावरील उपरणं गिरणीत अडकल्याने वृद्धाचे मुंडके धडापासून वेगळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पीठगिरणीत आडकल्याने धडापासून मुंडके झाले वेगळे

By

Published : Nov 2, 2019, 3:53 PM IST

चंद्रपूर - धान्य दळण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या खांद्यावरील उपरणं गिरणीत अडकल्याने वृद्धचे मुंडके धडापासून वेगळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित घटना जिवती तालुक्यात घडली असून, गंगाधर रामजी नलबले असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

जिवती तालुक्याती हिमायतनगर येथिल गंगाधर रामजी नलबले हे धान्य दळण्यासाठी गिरणीवर गेले होते. यावेळी त्यांच्या खांद्यावरील उपरणं गिरणीच्या पट्ट्यात ओढले गेल्याने क्षणातच नलबले यांचे मुंडके धडापासून वेगळे झाले.

यासंबंधी टेकामांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details