चंद्रपूर - अचानक अनियंत्रित झालेल्या एका हत्तीने माहुतावर हल्ला केल्याची घटना ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथील मोहुर्ली येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये माहुत जागीच ठार झाला आहे. मसराम असे मृत माहुताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.
चंद्रपुरात हत्तीच्या हल्ल्यात माहुत जागीच ठार - चंद्रपुरात हत्तीचा माहुतावर हल्ला
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पमधील मोहुर्ली येथील हत्तीने माहुतावर हल्ला केला. यामध्ये माहुत जागीच ठार झाला.
प्रातिनिधीक छायाचित्र
आज सकाळपासूनच हा हत्ती अस्वस्थ असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यात माहुत हा नेहमीप्रमाणे चारा चारण्यासाठी गेला होता. त्यावेळी हत्तीने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हत्ती 17 ते 20 वयोगटातील होता. या वयात अनेक हत्ती अनियंत्रित होतात, असे अभ्यासकांचे मत आहे. सध्या या हत्तीला नियंत्रित करण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.