चंद्रपूर-घर बांधकामासाठी रेती आणायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला आहे. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील राजूरा येथे घडली. मंगेश कोडापे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मागील महिनाभरापासून राजूरा तालूक्यात वाघाची दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसात वाघाच्या हल्यात मृत झाल्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येत आहे.
चंद्रपुरात वाघाची दहशत; पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या जोगापूर यात्रेला स्थगिती - चंद्रपूर वाघ बातमी
राजूरा तालुक्यात मागील महिनाभरापासून वाघाची दहशत वाढली आहे. तालुक्यातील मूर्ती येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. चिचबोडी येथे वाघाने हल्ला करुन शेतकऱ्याला जखमी केले होते. पन्नास वर्षाची परंपरा असलेली जोगापूरची यात्रा वाघांचा दहशतीमुळे स्थगित केली आहे.
हेही वाचा-पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बिल देण्यावरून वाद
राजूरा तालूक्यात मागील महिनाभरापासून वाघाची दहशत वाढली आहे. तालुक्यातील मूर्ती येथे वाघाच्या हल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. चिचबोडी येथे वाघाने हल्ला करुन शेतकऱ्याला जखमी केले होते. पन्नास वर्षाची परंपरा असलेली जोगापूरची यात्रा वाघांचा दहशतीमुळे स्थगित केली आहे. अशात वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतल्याने परिसरात भीती पसरली आहे. राजूरा शहरातील इंदिरा नगर येथील मंगेश कोडापे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी बैलबंडीने ते रेती आणायला गेले होते. दरम्यान, झुडुपात दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्यात कोडापे यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग कर्मचारी, नागरिक घटनास्थळी पोहचले. वनविभागाने पंचनामा केला. वाघाचा त्वरित बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.