चंद्रपूर - तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराने पोलीस ठाण्याच्या परिसरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. अशोक राऊत, असे मृत व्यक्तीचे आहे. ही घटना सकाळच्या सुमारास घडली.
मृत अशोक राऊत (वय 55 वर्षे) बुधवारी (दि. 6 डिसें.) सकाळी सिंदेवाही पोलीस ठाण्यात आले होते. घरगूती वादातून आपल्या भाऊ आणि मामा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, त्यांना यासाठी बाहेर बसण्यासाठी सांगण्यात आले. याच दरम्यान त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना लक्षात येताच अशोक राऊत यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.