चंद्रपूर - चिमूर नगर परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शेडेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. बलात्कारी नराधमाविषयी या मुलीने माहिती दिली आहे. प्राथमिक वैद्यकीय अहवाल आणि पीडितेच्या जबाबावरून या नराधमाविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधमास अटक करून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल - chandrapur rape news
संबंधित मुलीचे आई-वडील गावात अंत्यविधीला गेले होते. यादरम्यान, मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्याने मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. या नराधमाला चिमूर पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित मुलीचे आई-वडील गावात अंत्यविधीला गेले होते. यादरम्यान, मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्याने मुलीला ठार करण्याची धमकी दिली. या नराधमाला चिमूर पोलिसांनी अटक केली आहे.
उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पीडितेवर औषधोपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती चिमूर पोलिसांना दिली. पीडितेचा जबाब आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपीला अटक करण्यात आली. ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला पिटीचुवा जंगलातून अटक केली. पुढील तपास विभागीय पॉक्सो तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक कांता रेजीवाड करत आहेत.