महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात मानवी रांगोळीच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती - महर्षी विद्या मंदिर विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती

चंद्रपूरच्या महर्षी विद्या मंदिर शाळेतील 150 विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी मानवी रांगोळी साकारली. लोकशाहीच्या या प्रक्रियेत आपलाही सहभाग असावा, अशी या मागची भावना होती.

चंद्रपूरात मानवी रांगोळीच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती

By

Published : Oct 19, 2019, 4:16 PM IST

चंद्रपूर - राज्यात सोमवारी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. या वेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वेगवेगळे उपाय योजले जात आहे. चंद्रपूरच्या महर्षी विद्या मंदिर शाळेतील 150 विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी मानवी रांगोळी साकारली.

चंद्रपूरच्या महर्षी विद्या मंदिर शाळेतील 150 विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी मानवी रांगोळी साकारली

हेही वाचा... महारांगोळीच्या माध्यमातून मतदानाचा संदेश

चंद्रपूर बचाव संघर्ष समिती आणि महर्षी शाळा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकशाहीच्या या प्रक्रियेत आपलाही सहभाग असावा अशी या मागची भावना होती. महर्षी विद्या मंदिर शाळेच्या 150 विद्यार्थ्यांनी या प्रक्रीयेत सहभाग नोंदवला. चंद्रपूर जिल्ह्यात गेली काही वर्षे मतदानाची टक्केवारी घसरत आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने चित्ररथ - वोटर स्लिप या माध्यमातूनही मतदान जनजागृती चालवली आहे. महर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनीही 'मतदान करा' अशी प्रतिकृती साकारत मतदान विषयी मौलिक संदेश दिला.

हेही वाचा... नंदुरबारमध्ये मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

ABOUT THE AUTHOR

...view details