महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahakali Mahotsav Controversy : संजय राठोडांच्या प्रमुख उपस्थितीने चंद्रपुरातील महाकाली महोत्सव वादाच्या भोवऱ्यात - ग्रेसचे माझी नगरसेवक प्रवीण पडवेकरांचा विरोध

चंद्रपूर जिल्ह्यातील चार दिवसीय महाकाली महोत्सवाला ( Four Day Mahakali Festival Starting at Chandrapur ) आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांचीदेखील प्रमुख उपस्थिती या महोत्सवात असणार आहे. त्यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण ( Food and Drug Minister Sanjay Rathod Will Present ) झाला आहे. काँग्रेसचे माझी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांनी याबाबत स्पष्ट विरोध दर्शवला आहे. कारण यापूर्वी संजय राठोड यांना तरुणी आत्महत्येप्रकरणी आपले मंत्रिपद गमवावे लागले होते. अशाच व्यक्तीच्या उपस्थितीत महाकाली मातेच्या महोत्सवाचा शुभारंभ होण्यावर याला विरोधाचा सुरू उमटू लागला आहे.

Sanjay Rathod and Mahakali Mahotsav 2022
चंद्रपुरातील महाकाली महोत्सव वादाच्या भोवऱ्यात

By

Published : Oct 1, 2022, 12:39 PM IST

चंद्रपूर : चार दिवसीय महाकाली महोत्सवाला आजपासून सुरुवात होत ( Four Day Mahakali Festival Starting at Chandrapur ) आहे. यावेळी अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांचीदेखील प्रमुख उपस्थिती या महोत्सवात असणार आहे. त्यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण झाला आहे. कारण यापूर्वी संजय राठोड यांना ( Food and Drug Minister Sanjay Rathod Will Present ) तरुणीच्या संदर्भामधील आरोपावरून आपले मंत्रिपद गमवावे लागले होते. अशाच व्यक्तीच्या हस्ते स्त्रीचे दैवी रूप समजल्या जाणाऱ्या महाकाली मातेच्या महोत्सवाचा शुभारंभ होण्यावर आता विरोधाचा सुरू उमटू लागला आहे.

काँग्रेसचे माझी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांचा प्रखर विरोध :काँग्रेसचे माझी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांनी ( Congress Leader Praveen Padvekar Shown Opposition ) याबाबत स्पष्ट विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या महोत्सवात राठोड यांची उपस्थित हा वाद पेटण्याची शक्यता आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त श्री माता महाकाली सेवा समितीच्या वतीने संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसांत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

पूजा राठोड आत्महत्येप्रकरणी मंत्रिपदाचा द्यावा लागला होता राजीनामा :जोरगेवार यांनी यापूर्वी महाविकास आघाडीला समर्थन दिले होते. मात्र, यानंतर सत्तांतरांचे वारे वाहू लागल्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. या महोत्सवाचे संयोजक जोरगेवार असल्यामुळे शिंदे गटातील आता मंत्री झालेले संजय राठोड हे या महोत्सवात प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत. मात्र, ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येवरून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तिच्यासोबत राठोड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप करून विरोधकांनी त्यांना घेरले आणि याच आरोपामुळे राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

संजय राठोड यांची महाकाली महोत्सवाला हजेरी :आता ते शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना अन्न व औषध मंत्रिपद देण्यात आले आहे. सध्या ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून महाकाली महोत्सवात त्यांची हजेरी असणार आहे. मात्र, महाकाली, दुर्गा या स्त्री शक्तीच्या प्रतीक असणाऱ्या देवी आहे. मात्र, मंत्री राठोड यांच्यावर असलेले आरोप हे स्वतः तरुणीचे शोषण केल्याचे लागलेले आहेत. त्यांना याबाबत चौकशीत क्लीनचिट मिळाली आहे. मात्र, जे आरोप आहे ते अत्यंत गंभीर आहेत आणि असे आरोप असलेल्या मंत्र्याच्या हस्ते महाकाली मातेच्या पवित्र्याला गालबोट लागणार आहे.

राठोड यांना काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती :त्यामुळे असा आरोप करीत त्यांच्या विरोधाचे सूर आता सुरू लागलेले आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांनीदेखील यावर आक्षेप नोंदवला असून, या विरोधामध्ये आपण विरोध प्रदर्शन करणार, असे जाहीर केलेले आहे. ते राठोड यांना काळे झेंडे दाखविणार असल्याची गुप्तचर यंत्रणेची माहिती आहे. त्यामुळे आता राठोड या कार्यक्रमात महोत्सवात जातात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details