चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात लोकहिताच्या विविध योजना राबविल्या. यात गरीब कल्याणाच्या योजनांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. तळागाळातील सामान्य माणसाच्या चेह-यावर आनंद फुलावा, शेतकरी समृध्द व्हावा यासाठी मोदीजींनी अनेक निर्णय देखील घेतले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजयी झेंडा पुन्हा एकदा फडकेल ((Lotus will bloom again in Chandrapur Lok Sabha)), असा विश्वास देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्यक्त केला (Union Minister Hardeep Singh Puri confident ).
बल्लारपूर विधानसभा -बल्लारपूर येथे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या संघटनात्मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधताना केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी बोलत होते. यावेळी राज्याचे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेश बकाने, सुदर्शन निमकर, जैनुद्दीन जव्हेरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.